मोरगाव अर्जुनीत दुसरे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषद संमेलन

0
68

अर्जुनी /मोर : रविवार दि.१९ जानेवारी २०२५ रोजी दुसरे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषद संमेलन अर्जुनी मोरगाव येथील एस.एस.जे. महाविद्यालयात संपन्न होत आहे. पहिल्या सत्रात सकाळी ११वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन या संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. परशुराम खुणे तर उद्घाटक माननीय इंजिनियर श्री राजकुमार बडोले, आमदार अर्जुनी मोरगाव आणि स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. अनंता सूर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. संस्थाध्यक्ष श्री लुनकरण चितलांगे साहेब,मा.श्री बद्रीप्रसाद जायस्वाल साहेब,मा.श्री मुकेश जायस्वाल साहेब, तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.ईश्वर मोहूर्ले सर मा.सौ.छायाताई नागपुरे, मा.सौ.शारदाताई बडोले तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार मा.दिलीपभाऊ बनसोड,मा.डॉ.राज मुसने,मा.श्री प्रशांत नारायण दामले अमरावती कवी लेखक अभिनेते(हास्य सम्राट)मा.श्री रमेश शरदराव आल्हाट,मा. डॉ. श्याम मोहरकर सर यांची उपस्थिती राहणार आहे.
दुपारी १२.३० वाजता प्रा.छाया बोरकर यांच्या ‘शापित श्रृंखला’ या काव्यसंग्रहाचे,’ भारताची रणरागिणी’ या कादंबरीचे तसेच उमाताई गजभिये यांच्या ‘गर्भ रेशमी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून या पुस्तकांवर मा.प्रा. डॉ.अनंता सूर,प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले,डॉ.श्याम मोहरकर हे भाष्य करणार आहेत.तर दुसऱ्या सत्रात दुपारी १.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा,दंडार व हास्य विनोद अभिनयाचा कार्यक्रम होणार आहे.
तर तिसऱ्या सत्रामध्ये दुपारी ३.३० वाजता कवी संमेलनाचे उद्घाटन होणार असून कवी संमेलनाचे अध्यक्ष मा.डॉ.धनराज खानोलकर हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून मा.सौ.अंजनाबाई खुणे,मा.डॉ.इंद्रकला बोपचे, मा.प्रा.डॉ.कल्पना सांगोळे,मा.सौ. संगीता ठलाल,मा.सौ.सरोज अंदनकर या उपस्थित राहणार आहेत.तर निमंत्रित कवी म्हणून कुशल डांगे,केसरी हटवार,अंकुश पडघान,डॉ.डी.व्ही.खरात,ऍड. विजयकुमार कस्तुरे,वैशाली रामटेके, नागोराव सोनकुसरे,सुधा मेश्राम,प्रा. सुनीता रंगारी,प्रा.कल्पना सांगोळे, प्रतिभा रामटेके,सुवर्णा पवार, छोटूलाल चव्हाण,संतोष इनस्कर, पी.एस.बनसोड,दिनेश खैरे,सरिता बुटले,संजय निकम,अरुणकुमार कांबळे,अमरदीप लोखंडे,अस्मिता मेश्राम,सौ.पल्लवी आल्हाट,भारती तिडके,ओंकार राठोड,निखिल बन्सोड,अपेक्षा खोब्रागडे,डॉ.अलका दुधबुरे,देविदास वाघ,चक्रधर थोरात, रोशनी दाते,योगेश मांदाळे,धरती मैद, केवलचंद शहारे,मुरलीधर खोटेले,कविता राजाभोज,उमा गजभिये हे कवी आपल्या काव्यरचना सादर करतील.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी आणि साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक,संस्थाध्यक्ष प्रा.
छाया बोरकर यांनी केलेले आहे.

Previous articleभामरागड मधील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे.
Next articleस्कूली बच्चों ने दिया स्वच्छता और सुरक्षित ट्रैफिक का संदेश