सडक अर्जुनी : स्थानिक संबोधी बुद्ध विहारमध्ये सावित्री बाई फुले यांच्या जयंती कार्यक्रम रविवारी (ता. ५)आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तेजराम मडावी होते.कार्यक्रमाचे उदघाटन उदघाटक नगरसेविका शशिकला टेंभुर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विशेष अतिथी म्हणून रवींनंदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सुनंदा पंचभाई, होत्या.नगरसेवक अश्लेष अंबादे , गोपीचंद खेडकर, कामिनी कोवे होते. यावेळी मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर रविनंदा पब्लिक स्कूलचे संचालक रवींद्र पंचभाई, सेवानिवृत्त शिक्षक तथा सकाळचे तालुका बातमीदार, आर. व्ही. मेश्राम, कृषी सहायक रजनीकांत मेश्राम, शिक्षक विनय फुले, नगरसेविका शशिकला टेंभुर्णे, प्राचार्या सुनंदा पंचभाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहा गणवीर यांनी केले.संचालन रंजिता मेश्राम यांनी केले तर आभार मोसमी सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांता मेश्राम, मनीषा शहारे, गीता खोब्रागडे, अंजू कांबळे, शिला सूर्यवंशी, पूनम खोब्रागडे, मेघा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

