अल्पवयीन वाहनचालकांवर कडक कारवाईचा इशारा – पालक आणि शाळांना सूचना

0
999

गोंदिया – वाहतूक शाखेचा आदेश; नियमभंग करणाऱ्यांना २५,००० रु. दंड आणि ३ महिने कारावासाची शिक्षा

गोंदिया: जिल्हा वाहतूक शाखेने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना इशारा दिला आहे की, १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना दुचाकी चालविण्यास परवानगी देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

कायदेशीर तरतुदी आणि दंडात्मक कारवाई :
मोटार वाहन (सुधारित) अधिनियम २०१९ अंतर्गत कलम १९९ अ नुसार, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास संबंधित पालक किंवा वाहन मालकाला ३ महिन्यांपर्यंत कारावास आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

शाळा-कॉलेजांना ४८ तासांत सूचना देण्याचे निर्देश : वाहतूक शाखेने शाळा आणि महाविद्यालयांना ४८ तासांच्या आत सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना या नियमांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

वर्ग शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना सूचित करावे.

पालकांच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर संदेश पाठवून नियमांची जाणीव करून द्यावी.

उल्लंघन करणाऱ्यांसाठी कोणतीही तडजोड नाही : सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित पालक किंवा वाहन मालकांवर थेट कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये तक्रारींची कोणतीही दखल घेतली जाणार नाही, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांचा इशारा : 
वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे  गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Previous articleसंबोधी बुद्ध विहारमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Next articleगोरठा में स्वामी नरेन्द्राचार्य संस्थान ने किया रक्तदान शिविर का आयोजन