जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे पावन आगमन; 19 जानेवारीला गोंदिया नगरीत पादुका दर्शनाचा ऐतिहासिक सोहळा

0
114

 गोंदिया नगरीत उसळणार जनसमुदाय

गोंदिया :  अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी गोंदिया शहरातील टी.बी.टोली मैदान, गायत्री मंदिर जवळ, कुडवा नाका रोड येथे करण्यात आले आहे. हा मंगलमय सोहळा सकाळी 9 वाजता सुरू होणार असून, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा आहे.

या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक उपक्रम:

50 विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप.

गरजू शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंपाचे वाटप.

रक्तदान शिबिरे आणि गरजूंना तात्काळ रक्तपुरवठा.

मोफत ॲम्बुलन्स सेवा.

आर्थिक दुर्बल घटकांचे पुनर्वसन.

दुष्काळ व अतिवृष्टीग्रस्तांना मदत.

मोफत इंग्रजी माध्यम शाळेचा उपक्रम.

धार्मिक विधी व कार्यक्रम:

जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे पूजन.

गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन सोहळा.

उपासक दीक्षा व दर्शन.

पुष्पवृष्टीचा सोहळा.

सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2024 या कालावधीत संस्थेने समाजसेवेच्या विविध उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

75 मरणोत्तर देह दान.

महिला सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन वाटप.

शेतीसाठी मोफत साधनसामुग्रीचे वितरण.

जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचनांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून आधुनिक युगातील योग्य जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले जाईल. अध्यात्माच्या आधारे माणसाच्या जीवनाचा कायापालट कसा करता येईल याचा उलगडा होईल.

पूर्व विदर्भ पीठ प्रमुख भोयर साहेब, पीठ व्यवस्थापक प्रवीण परब साहेब, महिला निरीक्षक वैशाली चतुर, जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम, जिल्हा अध्यक्ष मूलचंद खांडवाये, जिल्हा सचिव जयपाल खांडवाये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगराज डोंगरवार, अध्यात्मिक प्रमुख हेमलता गिरेपूजे, महिला प्रमुख तारा राऊत, जिल्हा कर्नल प्रकाश कोरे, तालुका अध्यक्ष महेश राहागडाले, शिवाजी बोहरे, रवी भांडारकर, हेमंत टेंबरे, संतोष भेंडारकर, केशव मेश्राम, मंजुषा तरोणे, विजय जोशी, दिलीप ठाकूर, दामू शेंडे, शीला आकरे, शुभम दिगोरे, राजेश चतुर, राजेश कडव व इतर पदाधिकारी यांनी जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून अध्यात्म आणि समाजसेवेच्या या पर्वाला साक्षी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

Previous articleगोरठा में स्वामी नरेन्द्राचार्य संस्थान ने किया रक्तदान शिविर का आयोजन
Next articleफुटाळा येथे बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न