फुटाळा येथे बालक-पालक मेळावा उत्साहात संपन्न

0
114

सडक अर्जुनी : कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपूर द्वारा संचालित एकलव्य एकल विद्यालय विभाग सडक अर्जुनी केंद्र चिखलीअंतर्गत उपकेंद्र फुटाळा येथे ५ जानेवारीला बालक -पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या निमित्ताने त्यामध्ये धावणे स्पर्धा ,लांब उडी, गीत गायन, मुलांचे भाषण, संगीतखुर्ची ,पाढे पाठ आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात.याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कायकर्ते सचिन गहाणे, उपाध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष अमोल गहाणे होते.कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक सरपंचा लता गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष छाया गहाणे, उपाध्यक्ष पौर्णिमा वैद्य,पल्लवी गेडाम जयश्री चचाणे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक गहाणे,तसेच ग्रामपंचायत सदस्य, पळसगावच्या सरपंच भारती लोथे,कोसबीच्या पोलीस पाटील विद्या गहाणे,ग्रामशिक्षण समितीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गोंदियाचे ऍड. वंसत चुटे होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.आर. शाहारे यानी केले. संचालन सौ.एस.एम.तरोणे व जे.बी.चांदेवार यानी केले.तर आभार शिक्षिका मिनाक्षी वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पालक ,गावकरी,महिला यांनी लोकवर्गणी गोळा करून सामुहिक गाव भोजनाची व्यवस्था करण्याकरिता सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील केंद्र कोकणा,वडेगाव,शेंडा, बाम्हणी येथील पर्यवेक्षक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.