

आ. संजय पुराम यांच्या उपस्थितीत व्याख्यान आणि सत्कार सोहळा संपन्न
आमगांव : संकल्प पूर्व माध्यमिक शाळा पुराडा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रबोधिनी प्रसारक शिक्षण मंडळ आमगावचे सचिव मा. उत्तम नंदेश्वर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुराडा ग्रामपंचायतीचे सरपंच मा. लक्ष्मीकांत मरकाम, पोलिसपाटील सुभाष वालदे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विजय मडावी (सहायक शिक्षक) यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे यांनी केले.
आमदार संजय पुराम यांचा सत्कार संस्थेचे सचिव मा. उत्तम नंदेश्वर यांनी केला. तसेच नवनिर्वाचित संचालक संकल्प नंदेश्वर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक अंबादे आणि वसतिगृह अधीक्षक भुवनलाल हरिनखेडे यांनी केला.


कार्यक्रमात शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनात रंगत आणली.
जाहिर व्याख्यानाने समारंभाला गाजवले : सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रात प्रसिद्ध युवा प्रबोधनकार आणि प्रखर विचारवंत मा. जितेंद्रदादा आसोले यांच्या जोशपूर्ण व्याख्यानाने उपस्थितांची मनं जिंकली. सामाजिक परिवर्तन, शिक्षण आणि नवयुवकांच्या जबाबदारी या विषयांवर त्यांनी प्रभावी भाषण केले.
कार्यक्रमास शिक्षकवर्ग, पालक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संकल्प शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.






