फार्मसी महाविद्यालयात वार्षिक क्रीडोत्सव संपन्न

0
262
1

तीन दिवसीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आमगाव: भवभूती शिक्षण संस्थेच्या श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगाव येथे वार्षिक क्रीडोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवसीय या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास मानकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या सर्व घटक संस्थांचे प्राचार्य डॉ. जयंत बनसोड, कतलेवार, विजय राऊत आणि श्रीमती रीना भुते उपस्थित होते. डॉ. निंबेकर यांनी उद्घाटन प्रसंगी खेळाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, “खेळ विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मोजमापाची शिस्त, समन्वयक नातेसंबंध, आणि शिष्यवृत्तीच्या संधी प्रदान करतात.”

दि. ६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धेत डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळांमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल, रस्सीखेच, क्रिकेट आणि धावण्याच्या विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आपली कौशल्ये सादर केली.

स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संचालक केशवराव मानकर आणि डॉ. डी. के. संघी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल सोरी, परमेश्वर वानखेडे, देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, जितेंद्र शिवणकर, आणि श्रीमती रोशनी अग्रवाल यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या क्रीडोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सांघिक भावना आणि खेळाचा आनंद वृद्धिंगत झाला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.