पद्मश्री डॉ.परशुराम खुणे दुसऱ्या अ.भा. मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष

0
69

अर्जुनी /मोर. : झाडीपट्टी रंगभूमीचे महानायक जेष्ठ नाट्य कलावंत नटसम्राट झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून ओळख असलेले रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे डॉ. परशुराम खुणे हे अर्जुनी /मोर येथे दि. १९ जानेवारी २०२५ ला आयोजित दुसरे अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष असणार आहेत.

लोक कलाकार नक्षलवादी क्षेत्रातील पुनर्वसन आणि सामाजिक परिस्थितीत लढण्याची ताकत त्यांनी आपल्या कलेच्या उपयोगात केला. गडचिरोली जिल्ह्यातील गुरनोली गाव येथील रहिवाशी असून त्यांनी विष २० वर्ष गडचिरोली जिल्यातील गुरनोली ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच पद भूषवले.

यांनी पन्नास वर्ष झाडीपट्टी रंगभूमीची सेवा केली तर आतापर्यंत पाच हजाराहून अधिक नाटकांत आठशे वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत.पन्नास वर्षापासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोद नट म्हणून त्यांची प्रख्यात ख्याती अस्तित्वात असून मराठी रंगभूमी त्यांनी गाजवलेली आहे.संगीत ”एकच प्याला”नाटकातील तळीराम सिंहाचा छावा मधील शंखनाद संगीत ‘लग्नाची बेडी” या नाटकातील ‘अवधूत ‘ लावणी भुलली अभंगाला” मधील गणपा अश्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.तर त्यांनी विविध साकारलेल्या विनोदी भूमिकेमुळे त्यांना झाडीपट्टीतील “दादा कोंडके”अशी उपाधी दिली जाते.

डॉ.खुणे हे उत्तम कलेचे जादूगार असून त्यांनी आपल्या कलेचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी केला आहे.खुणे यांनी शेतीचे अनेक उपक्रम राबवून शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही पटकाविला आहे. २०२३ मध्ये समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन, २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्कार भारत सरकार नगर परिषद शाखा मुंबई माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या हस्ते असे विविध कलागुणांनी बहुरंगी व्यक्तिमत्व असणारे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे गाजलेले नाटक सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, संगीत महानंदा, लावणी भुल्ली अभंगाला, एकल्लकोड मल्हार, लग्नाची बेडी, वेताळ, एका संसाराची व्यथा, भूकंप, नाथा हा माझा” नवा संसार, ज्वालामुखी, भूक,इत्यादी नाटके गाजलेली असून मराठी सिनेमे “पहिले पाऊल जीवनाचं, रंग माझा वेगळा, निबंध इत्यादी नाटक , सिनिमे असून त्यांना सिनेनट म्हणून अनेक पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहेत असे विविध कलागुणांनानी बहुरंगी वैदर्भीय कलेची परंपरा जोपासणारे गडचिरोली सारख्या जंगली भागात नाट्य कला जोपासणारे रंगभूमी हीच कर्मभूमी म्हणून अस्तित्व निर्माण करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ. पद्मभूषण परशुराम खुणे हे दुसऱ्या अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष भूषविणारे एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेले आहेत.

Previous articleवार्षिक स्नेह सम्मेलन 2025: विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव जल्लोषात संपन्न
Next articleआलापल्ली येथे नायनाल मांजा विक्री करणाऱ्या वर गुन्हा दाखल