
गडचिरोली /प्रतिनिधी
आलापल्ली येथे नाईट मांझा विक्री करणाऱ्यां दुकानदारावर अहेरी पोलिसांकडून कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीचे नाव शालिकराम शिवाजी बान्ते वय-55 वर्ष रा.बाजरवाडी आलापल्ली वार्ड क्रमांक 4 ता. अहेरी जि. गडचिरोली असे असून त्याच्याकडे 02 नग MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली रिल प्रत्येकी विक्री किंमत अंदाजे 500/- रु एकुण किमंत 1000/- रु असा मुद्देमाल सापडला आहे. सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले यांच्यासह,मपोहवा शारदा अर्का,तपासी अंमलदार मनिषा मुलकावार यांनी केली आहे.आरोपीच्या किराणा दुकानात MONO KITE नावाचे लेबल असलेले नायलॉन मांजा पिवळा रंगाचा असलेली दोन रिल अवैधरित्या विक्रीकरिता बाळगून मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. सदर आरोपी यांने मानवी जीवतास व पशु पक्षाचे जिवीतास धोका निर्माण होईल असा मांजाचा माल ठेवून मा.जिल्हा अधिकारी गडचिरोली यांचे नायलाॅन मांजा धागा निर्मिती विक्री व वापर न करण्याबाबतचे मनाई आदेश क्र कार्या-2/-अ.का.दंडा /कावि/1227/2024 दिनांक 03/12/2024 च्या मनाई आदेश्याचे उलंघन केल्याने सदर आरोपी विरुद्ध फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार वरुन कलम 223 भा.न्या.सं सहकलम 5,15 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


