संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार
गोंदिया : दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.
संमेलनाचे ऐतिहासिक महत्त्व : ७९ वर्षांपूर्वी दिल्लीत आयोजित साहित्य संमेलन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटित झाले होते, तर स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ आणि संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संमेलनाचे प्रमुख मानकरी
संमेलनाध्यक्ष: डॉ. तारा भवाळकर
अध्यक्ष (अ. भा. म. सा. महामंडळ): प्रा. उषा तांबे
स्वागताध्यक्ष: पद्मविभूषण शरद पवार
लखनसिंह कटरे निमंत्रित कवी म्हणून सहभागी : या साहित्य संमेलनातील २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी होणाऱ्या निमंत्रित कवी संमेलनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक लखनसिंह कटरे यांना निमंत्रित कवी म्हणून सहभागी होण्याचे सन्माननीय आमंत्रण देण्यात आले आहे. महामंडळाने त्यांच्या सहभागाची अधिकृत खात्री लवकर कळवण्याचे आवाहन केले आहे. लखनसिंह कटरे यांचा सहभाग संमेलनाचा विशेष आकर्षण ठरणार आहे.
या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेच्या साहित्यिक वारशाचा उत्सव दिल्लीच्या भूमीवर पहिल्यांदाच रंगणार आहे.

