आमगाव – गोंदिया जिल्हा इंटिग्रेटेड होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी गडचिरोलीचे खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान यांना दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी प्रतिवेदन सादर केले.
प्रतिवेदन देण्याच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय देशमुख, माजी अध्यक्ष डॉ. अजय उमाटे, डॉ. टी.डी. कटरे, डॉ. साजिद खान, डॉ. अभय बोरकर, डॉ. ललित कलंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. वंदना काळे, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे सचिव इसुलाल भालेकर, राजू काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी खासदार डॉ. किरसान यांनी हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करण्याचे वचन दिले. तसेच, नॅशनल हेल्थ कमिशन दिल्ली, केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्याचे आरोग्य मंत्री व आरोग्य सेवा संचालक, मुंबई यांना त्वरीत पत्र पाठवण्याच्या सूचना दिल्या.
ही मागणी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या हक्कांसाठी आणि सेवांच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

