राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले जयंतीचा आमगावमध्ये उत्साहपूर्ण सोहळा
आमगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम तिरथ येत्रे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बाळूभाऊ वंजारी, भूमेश शेंडे, तालुका अध्यक्ष मुकेश उजवने, मुनेश पॅंचेश्वर, इंद्रपाल राजू लाडसे, अनिता ठाकरे, सोनू महानंदी, संगीता पाथोडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
या जयंती उत्सवात समाजातील आदर्श महापुरुषांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

