कुडवा येथे २.२८ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते भूमिपूजन

0
49

गोंदिया :  तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुडवा येथे मकर संक्रातीच्या पावन पर्वावर खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने २ कोटी २८ लाख रुपयांच्या नागरी सुविधा व अन्य योजनांच्या विविध विकास कामांचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा समाजकल्याण सभापती सौ. पूजा अखिलेश सेठ, सरपंच श्री बाळकृष्ण पटले यांच्या सतत पाठपुराव्यांमुळे ग्राम कुडवा येथे विविध विकास कामे मंजूर करण्यात आली. याप्रसंगी ग्राम कुडवा येथे पोलीस चौकी मंजूर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थानी केली यावर खा.श्री प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून लवकरच मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच येणाऱ्या काळात कुडवा व परिसराच्या प्रगती व विकासासाठी प्रयत्न करणार याची ग्वाही माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दिली व मकर संक्रातीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

भूमिपूजन प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, कमलनाथ फरदे, दिलीप गौतम, सुंदरीबाई तांडेकर, तेजेश्वरी पतेह, नूतन वाडेगावकर, कीर्ती उके, अनिल जगणित, पायल बागडे, पन्नालाल डहारे, जयश्री ढोमणे, शांतकला लटये, संदीप कडुकर, गीता चौधरी, वैशाली विंचूरकर, उपेंद्र पारधी, ओमप्रकाश हरिणखेडे, अलका शेंडे, दीप्ती राणे, रमेश गौतम, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक, सुनील पटले, प्रदीप ठाकरे, लिमेन्द्र बिसेन, डुमेन्द्रनाथ बिसेन, लक्ष्मीकांत कटरे, तुळशीराम बांडेबुचे, रामचंद्र टेभंरे, दुर्गा बहादूर, नितीन ढोमणे, येमेन्द्र बिसेन, संजय कटरे, विजेंद्र कटरे, हेमेंद्र हिरापुरे, महेश तांडेकर, प्रितकुमार लटये, बुद्धरत्न बागडे, करीम बिसेन, राजेंद्र वाडेगावकर, महेश मेश्राम, रौनक ठाकूर, महेंद्र माहूरकर, गोपाल नगरे, सुशील शेंडे सहित ग्रा. प. पदाधिकारी, गावकरी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.