तिरोडा : राज्यस्तरीय अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये स्थानिक सि.जे.पटेल महाविद्यालयाच्या दानीश शेख या विद्यार्थ्यांची सहभागी होण्यासाठी निवड झालेली आहे. हा महोत्सव राज्यस्तरीय असून नागपूर विद्यापीठाकडून आयोजित केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. या स्पर्धेतून निवडलेले विद्यार्थी वाणिज्य, विज्ञान, कला, सायन्स आणि टेक्नॉलॉजी अश्या विविध क्षेत्रातून असतात. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची गुणवत्ता, नाविन्य आणि समाजातील आवश्यकतेनुसार यासर्व बाबींचे महत्त्व जाणून स्पर्धेत स्थान मिळते.
अविष्कार संशोधन महोत्सव हा विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन क्षेत्रात नाविन्य आणण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची उत्तम संधी असते. यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी नवीन ज्ञान आणि संधीचा शोध घेतात. सी. जे पटेल महाविद्यालय तिरोडा येथील *दानीश शेख* हा विदयार्थी विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या अविष्कार महोत्सवात जी. एच. रायसोनी इंजिनीरिंग महाविद्यालय हिंगणा येथे सहभागी होणार आहे, त्याचा प्रकल्प *लाईट फेलडिटी* हा नॅनो सायंस व टेक्नॉलॉजी या विषयावर आधरित आहे. त्याला या प्रकल्पात तज्ज्ञांकडून तसेच मूल्यांकन समितीचे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाले आहे. दानिशच्या सहभागाने त्याचा शैक्षणिक प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. या यशाचे श्रेय त्याने प्राचार्य डॉ. अजय शर्मा, महाविद्यालयचे आविष्कार कमिटीचे समन्यवयक डॉ. राजकुमार भोंडे व डॉ. शीतल निमजे यांना दिले आहे.
अविष्कार महोत्सवात सहभाग घेऊन पुढील टप्पा गाठणे हा महविद्यालासाठी अभिमानाची बाब असून एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या यशाने आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. दानिशचे कष्ट, समर्पण आणि नाविन्यपूर्ण विचार हेच त्यांच्या यशाचे कारण आहे.
– प्राचार्य डॉ.अजय भारत शर्मा.

