शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भारतीय किसान संघाचा ठाम लढा

0
62

जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे मागण्यांसाठी निवेदन सादर

गोंदिया : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे दि.15  जानेवारी रोजी आंदोलन पार पडले. शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांसाठी निवेदन सादर करताना शेतकऱ्यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तात्काळ उपाय योजण्याचा आग्रह धरला.

या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगल बिसेन यांनी केले. त्यांच्या सोबत प्रांत मंत्री नूतन येडे, तसेच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

विविध समस्या व मागण्यांसाठी निवेदन सादर करतानाडॉ. मंगल बिसेन (अध्यक्ष, भारतीय किसान संघ, गोंदिया जिल्हा),नूतन येडे (प्रांत मंत्री, विदर्भ),गंगाराम येडे (उपाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी),मुन्नालाल बघेले (जिल्हा उपाध्यक्ष),ललित रहांगडाले (अध्यक्ष, गोंदिया तालुका),रामदयाल तुरकर (मंत्री, गोंदिया तालुका),मेंढे सर (उपाध्यक्ष, आमगाव तालुका)ओम प्रकाशजी भास्कर (अध्यक्ष, सालेकसा तालुका),रवींद्र बिसेन (अध्यक्ष, गोंदिया तालुका),चंद्रकांत पारधी (मंत्री, गोरेगाव तालुका),नितेश रहांगडाले (जिल्हा युवा प्रमुख),दिलीप ठाकूर (कार्यालय प्रमुख, गोंदिया) पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य मागण्या:

1. शेतपिकांच्या नुकसानीसाठी भरपाई तात्काळ मंजूर करावी.

2. वन्य प्राण्यांपासून शेतांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

3. पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.

4. शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ लवकर उपलब्ध करून द्यावा.

शेतकऱ्यांच्या समस्या गंभीरपणे ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले. आंदोलनात सहभागी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या लढ्याला नवसंजीवनी दिली असून, त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रशासन त्वरित पावले उचलेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.