भामरागड:- बदलत्या काळानुसार बदललेल्या मानवी गरजा व समाजापुढील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षणपध्दतीत बदल होणे क्रमप्राप्त ठरते. त्यानुसार आयोगाने केलेल्या विविध शिफारसी विविध शिक्षणतज्ज्ञांच्या सुचना लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करुन लागू करण्यात आले आहे. त्यात करण्यात आलेले बदल व मांडलेल्या नवनवीन संकल्पना विद्यार्थ्यांना समजून घेणे आवश्यक आहे. असे मत प्रा. विकास चित्ते यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थीसाठी उपयोग कश्या प्रकारचे आहे असे मत प्रा. डॉ. प्रफुल नांदे यांनी व्यक्त केले.
राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये 15 जानेवारी रोजी आयोजित स्कूल कनेक्ट २.० या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एस. एच. खंडारकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जय पेरसापेन आश्रम स्कुल चे मुख्याध्यापक श्री. शाईनअली सय्यद, कु. एम. बी. गावंडे मॅडम, श्री. विनोद नन्नावरे, प्रा. सि. एम. चालुरकर, प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे, प्रा. विनायक मोराळे इ. उपस्थित होते. इयत्ता 9 ते 10 शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना नवीन राष्टीय शैक्षणिक धोरणाचे स्वरुप समजावे त्यानुसार शैक्षणिक क्षे़त्रात होणारे बदल समजून यावेत यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राजे धर्मराव हायस्कुल तथा कनिष्ट महाविद्यालय भामरागड, भंगवतराव आश्रम स्कुल भामरागड तसेच जय पेरसापेन हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय तसेच साई प्रसाद वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथील विद्यार्थी सहभागी झाले.
संचालन प्रा. डॉ. संतोष सं. डाखरे, कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे तर आभार प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्री. बन्डु बोन्डे, श्री. विवेक येरगुडे, श्री. रमेश गाडगे यांच्यासह शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

