आमगाव पोलीसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतुकीवर धडक कार्यवाही

0
2465

१७.५२ लाखांचा अवैध माल जप्त, सात आरोपी ताब्यात

गोंदिया, (१६ जाने.) : आमगाव पोलीस ठाण्याने अवैध गौण-खनीज रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली असून, दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीसह १७,५२,००० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमगाव पोलिसांनी घाटटेमनी बीट, मानेकसा जंगल परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली. गुप्त बातमीदाराने वाघनदी घाटातून रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचला आणि रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीला पकडले.

जप्त मालाचा तपशील:

1. पहिला ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. नसलेला):

रेती: १ ब्रास (६,००० रुपये)

ट्रॅक्टर: ७,००,००० रुपये

ट्रॉली: १,५०,००० रुपये

एकूण किंमत: ८,५६,००० रुपये

2. दुसरा ट्रॅक्टर-ट्रॉली (ट्रॉली क्र. एमएच ३५-जी-६१२४):

रेती: १ ब्रास (६,००० रुपये)

ट्रॅक्टर: ७,५०,००० रुपये

ट्रॉली: १,४०,००० रुपये

एकूण किंमत: ८,९६,००० रुपये

जप्तीची एकूण किंमत: १७,५२,००० रुपये

पोलिसांनी या प्रकरणी  विनोद सुखदेव शेंडे (४०, रा. भोसा),चंद्रप्रकाश रामा कांबळे (२५, रा. बोदा), दिनेश मन्साराम चक्रवर्ती (३३, रा. टेकरी),घनश्याम टेनलाल वाढीवा (३३, रा. बंजारीटोला), मयुर मारोती मानकर (३०, रा. टाकरी), रविकांत गणेश उईके (२३, रा. टेकरी), शिलचंद माधवराव शेंडे (२५, रा. बंजारीटोला)सात जणांना ताब्यात घेतले आहे

आरोपींविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: गुन्हा क्रमांक २६/२०२५ व २७/२०२५,भारतीय दंड संहितेचे कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हे नोंद केला आहे.तपास पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा (कॅम्प देवरी), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस हवालदार मेश्राम, विनोद उपराडे, चेतन शेंडे, भागवत कोडापे, आणि दिनेश वानखडे यांनी ही कामगिरी केली.

 

Previous article150 वर्षों की उत्कृष्ट सेवा: भारत मौसम विज्ञान विभाग का भव्य समारोह
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे ध्येय पूर्ण करा : विजय शिवणकर