डी. बी. ए.पब्लिक स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा 

0
52

गडचिरोली /प्रतिनिधी

अहेरी येथे असलेल्या डी.बी..ए पब्लिक स्कूल आपल्या गुणवत्तापूर्वक शिक्षणासाठी व विविध शालेय उपक्रमामुळे सतत चर्चेत राहते. सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मारावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सदर शाळेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.डी.बी.ए पब्लिक स्कूल अहेरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 16 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम, हर्षवर्धनराव बाबा आत्राम माजी पंचायत समिती सदस्य सूर्यभान डोंगरे एपीओ अहेरी,राजेंद्र टिचकुले बी.ई.ओ अहेरी, रवींद्र बाबा आत्राम ए. पी. एम.सी. अध्यक्ष, विनोद पुसलवार केंद्रप्रमुख, उदय प्रकाश गलबले एडोकेट, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर बाबा आत्राम, विश्ववंतराव बाबा आत्राम नगरपंचायत सदस्य अहेरी जगन्नाथराव सडमेक,नारायणराव बाबा आत्राम, हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते. चिमुकल्यांचे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.यावेळेस विविध क्रीडा स्पर्धेत विजयी खेळाडूंना माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पुरस्कार सुद्धा वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सपना वेन्नुरी यांनी तर संचालन सपना मेश्राम व मनिषा मुडपल्लीवार यांनी केले. आभार शिक्षक अन्सार शेख यांनी मानले. विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून वेगवेगळ्या गीतातून नृत्याचे सादरीकरण केले.यावेळी नारायणराव बाबा आत्राम, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सुरेंद्र अलोणे, नागेश मडावी, संतोष बेझंकिवार, विद्यार्थी, पालकवर्ग व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यशस्वितेसाठी वैष्णवी कैदलवार, हिना पठाण, प्रदीप देशपांडे, विकास आचेवार, रणजित सोनावणे कशिष शेख, मनोज कैदलवार, सविता रामटेके, मनीषा ठाकरे, निखिल, श्रीलता श्रीरामवार आदींनी सहकार्य केले.