राजे विश्वेश्वर कला -वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा संपन्न

0
173
1

भामरागड – महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”या उपक्रमाअंतर्गत “पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा”दिनांक १६/०१/२०२५ रोजी घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सी.एम.चालुरकर सर होते तर प्रमुख पाहुणे डॉ.एस एम.डोहणे ,डॉ.पी.एस.घोनमोडे., डॉ.एस.एस.डाखरे., डॉ.के.व्हि.निखाडे., प्रा.व्हि.एस.तावेडे.सर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या व सत्यवान महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चालुरकर सरांनी विद्यार्थींना पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धबददल सविस्तर माहिती दिली. स्पर्धा कोणतीही असो सतत वाचन केल्याशिवाय माणूस स्पर्धा मध्ये टिकून राहात नाही.असे प्रतिपादन केले.तर प्रमुख पाहुणे डॉ डोहणे सरांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन आवश्यक आहे.असे सांगितले. डॉ घोनमोडे सरांनी सतत वाचनाची सवय लागली पाहिजे.असे मत व्यक्त केले.

डॉ डाखरे सरांनी प्रत्यक्ष कथा सांगुन विद्यार्थीची मने जिंकली.तर डॉ निखाडे सरांनी पुस्तक परीक्षण व कोणत्या ही स्पर्धा असो त्या स्पर्धेत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.निबंधाचे वाचन विद्यार्थीनींनी केले.तर सुत्रसंचलन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा मोराळे व्हि.आर.यांनी केले.आभार प्रदर्शन विद्यार्थी किरण कुरसामी नी केले आहे.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडु बोंडे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleडी. बी. ए.पब्लिक स्कूल मध्ये स्नेहसंमेलन उत्साहात साजरा 
Next articleसुप्त गुणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो,आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन..