20 जानेवारीला होणार सभापतीपदाचा निर्णय
तिरोडा: पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून, उपसभापती हुपराज जमईवार हे प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय अनुभवामुळे जनतेत मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
हुपराज जमईवार हे तिरोडा तालुक्यातील अत्यंत सक्रिय आणि लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी अनेक विकासकामांमध्ये पुढाकार घेतला असून, स्थानिक पातळीवर ग्रामविकासासाठी आपले योगदान सिद्ध केले आहे. त्यांच्या नावावर चर्चा होण्यामागे त्यांच्या कार्यक्षमतेचा मोठा वाटा आहे.
सभापतीपदासाठी पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा :तिरोडा पंचायत समितीत सध्या विविध गटांमध्ये सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. हुपराज जमईवार यांचा पक्ष आणि समर्थक त्यांना मजबूत उमेदवार मानत असून, त्यांच्या नावाभोवती स्थानिक जनाधार तयार झाला आहे.
सभापतीपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असेल. 20 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोणता नेता सभापतीपदी विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हुपराज जमाइवर यांचे नाव चर्चेत असल्याने, त्यांच्या निवडीमुळे तिरोडा पंचायत समितीच्या भविष्यातील विकासाला गती मिळण्याची अपेक्षा स्थानिक जनतेने व्यक्त केली आहे.

