गडचिरोली /प्रतिनिधी
गडचिरोली:मागील काही वर्षांपासून एका विभागातील अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून बसला असून लिटरल डिग्रीचा वापर करून पदोन्नती घेऊन अधिकारी राज गाजवत असल्याची खमंग चर्चा गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे..सदर डिग्री पदोन्नती साठी आहे काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्हा मुख्यालयात एक अधिकारी प्रभारी पदाचा वापर करीत आपल्या विभागातील कोट्यवधी रुपयांचा निधीची कामे स्वतः मॅनेज करून मोठी माया जमवली आहे. अशीही चर्चा गुप्तपणे सुरू आहे.सदर अधिकारी एवढ्यावरच न थांबता लिटरल डिग्री दाखवून पदोन्नती घेण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणचे सदर डिग्री शासनाने बॅन केलेल्या परराज्यातील संस्थेकडून मिळविली असून त्या डिग्रीचा वापर करून शासनाची दिशाभूल तर करीत नाही ना ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.सदर व्यक्ती मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातच एका विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रभार सांभाळत असून त्यांनी आता थेट पदोन्नती साठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.सदर व्यक्ती सेवेत कार्यरत असताना डिग्री मिळविण्यासाठी केंव्हा परीक्षा दिली,कुठली रजा घेतली, सेवापुस्तिकेत नोंद आहे काय ? याचा देखील तपास होणे महत्त्वाचे आहे.पदोन्नतीसाठी बोगस डिग्रीचा वापर होत असल्याची शंका निर्माण होत आहे.
बॉक्स—-
-सदर विषय गंभीर असून शासनाची दिशाभूल तर होत नाहीये ना ? याबाबत उच्च स्तरीय चौकशी करण्यासाठी शासनाला निवेदन देणार.
-संतोष ताटीकोंडावार
जिल्हाध्यक्ष, जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती,गडचिरोली जिल्हाध्यक्ष

