भाजपच्या सौ. योगिता पुंड सभापती तर सौ. सुनंदा उके उपसभापती निर्विरोध निवड

0
1354
1

आमगाव पंचायत समिती निवडणूक

आमगाव – आमगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. योगिताताई यशवंत पुंड आणि उपसभापतीपदी सौ. सुनंदाताई तेजराम उके यांची निर्विरोध निवड करण्यात आली. या दोघीही भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रतिनिधी आहेत.

प.स.आमगांव सभापती आणि उपसभापती निवडणुकीत भाजपच्या इतर सदस्यांमध्ये राजेंद्र गौतम, नोहरलाल चौधरी, तिलकचंद मडावी, सरिता हरीणखेडे, आणि गीताबाई शेंडे यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाच्या (राका) शीला ब्राह्मणकर आणि काँग्रेसचे तारेंद रामटेके व नंदकिशोर कोरे यांचा सहभाग होता.

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात सत्कार केला.

निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार सौ. मोनिका कांबळे यांनी संपूर्ण देखरेख केली. त्यांच्यासोबत नायब तहसीलदार सतीश वेलाडी, एम.जी. पालीवाल, आणि एस.बी. बागडे यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

नवनिर्वाचित सभापती सौ. योगिता पुंड यांनी सांगितले की, पंचायत समितीच्या कामांना नवीन गती आणि दिशा देण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. जनहिताला प्राधान्य देऊन योजना अंमलात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

सभापती व उपसभापती यांच्या निर्विरोध निवडीवर भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.