- गोरेगांव : पी.डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे संक्रांत निमित्त दिनांक 20/01/2025 रोजी महाविद्यालयात माता पालक मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ शिक्षिका एम.डी.राहांगडाले माता पालक संघाचे उपाध्यक्ष सुनिता व्यंकटराव पटले प्रमुख पाहुणे दर्शना पारधी, ओमेश्वरी पटले, केशर रहांगडाले, सत्यशिला सोनवाने, सविता खरवडे, इंद्रकला खरवडे, सुनिता पटले उपस्थिती होते. कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. अध्यक्ष व पाहूण्यांचे स्वागत गीत व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.डी.राहांगडाले यांनी सादर केला. सर्व शिक्षिकांतर्फे माता पालक यांना हळदी कुंकू व वाण देण्यात आले.
- यावेळी विविध खेळ घेण्यात आले. एक मिनिट शो मध्ये वैशाली गाढवे, सविता खरवडे विजयी झाले. संगीत खुर्ची स्पर्धाचे विजेते खेलन पटले, सविता खरवडे या सर्व विजयी स्पर्धकांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. भरपूर संख्येने माता पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य सी.डी.मोरघडे व पर्यवेक्षक ए.एच.कटरे यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कु.जे.वाय.बिसेन कु.एस.जी.दमाहे, कु.काजल पटले, कु.किरण कटरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मौलाचे सहकार्य केले. संचालन एस.आर.मांढरे व आभार प्रदर्शन ए.एस.बावनथडे यांनी केले.

