जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव (आमगाव) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
263
1

आमगांव : महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व केमिस्टांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ यावेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बनगाव (आमगाव) येथे होणार आहे.
आपल्या रक्तदानाने अनेकांना जीवनदान देण्याचा संदेश देणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करून आपले योगदान देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गोंदिया जिलाध्यक्ष उत्पल शर्मा,उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा ग्रामीण रुपेश तिवारी आणि आमगाव तालुका अध्यक्ष नरेंद्र काळुराम बहेटवार यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: 9595606825, 8484810746.