राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत विद्या निकेतनची कु. हर्षा भांडारकर ठरली यशस्वी; ब्राँझ मेडल पटकावले

0
303

आमगाव : विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाची १२ वी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. हर्षा भांडारकर हिने राज्यस्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य दाखवत ब्राँझ मेडल पटकावले. या यशामुळे तिने तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कु. हर्षाच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सिंग, प्रा. प्रकाश कटरे, प्रा. संजय बुराडे, प्रा. तरोने, प्रा. बारसे व इतर शिक्षकवर्गाने तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या किकबॉक्सिंगमधील प्रावीण्याने महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

 स्थानिक पातळीवर तिच्या यशाची चर्चा होत असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. कु. हर्षाचे यश विद्यार्थ्यांना मेहनत आणि चिकाटीचे महत्त्व पटवून देणारे आहे.