फार्मसी महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

0
166
1

आमगाव : भवभूती शिक्षण संस्था संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि प्रमुख अतिथींच्या सक्रिय सहभागामुळे एक प्रेरणादायी वातावरण तयार झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य पाहुणे डॉ. साजिद खान, स्नेहा मानकर, प्रमुख अतिथी गणेश ब्राह्मणकर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर उपस्थित होते.

महोत्सवात वैयक्तिक गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, नाटिका, फॅशन शो आणि अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान गणेश ब्राह्मणकर यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या संधी आणि करिअरविषयक संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख जितेंद्र शिवणकर, खुशी गुप्ता आणि विद्यार्थी प्रमुख श्रीधर भांडेकर, साक्षी बिसेन, मृदाली कठाने, मृणाली रीनायते, प्राची उकरे, ऋतिक चैतवार यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

विविध स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे प्राध्यापक देवेंद्र बोरकर, महेंद्र तिवारी, दीक्षा खोब्रागडे, रोशनी अग्रवाल, मनीषा बिसेन, आणि राणी भगत यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे हा सांस्कृतिक महोत्सव संस्मरणीय ठरला.