आमगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा माँ गडकालीका संस्थेकडून सत्कार

0
224

आमगाव: माँ गडकालीका बहुउद्देशीय संस्था आमगावच्या शिष्टमंडळाने आज, दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी आमगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. योगिता पुंड आणि उपसभापती सौ. सुनंदा उके यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन औपचारिक सत्कार केला.

शिष्टमंडळात संस्थेचे अध्यक्ष बि.एम. कटरे, सचिव डी.एम. टेंभरे, उपाध्यक्ष एच.पी. पटले, कोषाध्यक्ष टेकराम पटले तसेच इतर मान्यवर सहभागी होते. संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, विविध उपक्रमांसाठी सहकार्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

Previous articleफार्मसी महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
Next articleअँड रामकुमार लिल्हारे बने आमगाव के नोटरी अधिकारी