१२ वी वर्गाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

0
411
1

आमगाव, २२ जाने. : आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे कला विभागातर्फे १२ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  डी. एम. राऊत होते, तर प्रमुख वक्त्या कु. वी. पी. राऊत यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

या समारंभात ११ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी गीतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक यू. एस. मेंढे,  पी. जी. कावळे, कु. आर. जी. अंबुले, कु. एस. टी. पटले, वी. टी. भुसारी हे शिक्षक मंचावर उपस्थित होते.

प्रमुख वक्त्या कु. वी. पी. राऊत यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्याचा संदेश दिला. यावेळी प्राचार्य डी. एम. राऊत आणि यू. एस. मेंढे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले आणि पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ११ वीच्या विद्यार्थ्यांनी केले. समारोप वंदे मातरम् गाण्याने झाला आणि उपस्थित १२ वीच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमास कला विभागातील सर्व विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.

 

Previous articleविज्ञान आणि गणित कॅस्केड कार्यशाळा गोंदियात यशस्वीपणे संपन्न
Next articleएमपीएससी परीक्षेत यशस्वी कु.प्रणया भालेकर यांचा सत्कार