आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी विज्ञानचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
आमगाव : आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित निरोप समारंभात १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांचा निरोप घेतला गेला. या प्रसंगी माजी विद्यार्थिनी व एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या कू. प्रणया भालेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. एम. राऊत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक यु. एस. मेंढे उपस्थित होते. यावेळी कु. प्रणया भालेकर यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी झाली, ज्यात त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी गीतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
कु. प्रणया भालेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मंचावर शिक्षक कू. टी. टी. पटले, सौ. वाय. जी. हलमारे, व्ही. टी. भुसारी,बी. जी. कावळे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
प्राचार्य डी. एम. राऊत आणि पर्यवेक्षक यु. एस. मेंढे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ११ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी केले. समारोप वंदे मातरम् गायनाने झाला. यानंतर १२ वीच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विज्ञान विभागाचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

