शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकडे वाटचाल

0
183

गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे आज शहर, तालुका आणि सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वातील जनकल्याणकारी योजना, प्रगतीशील दृष्टिकोन आणि विकासकार्यांवर विश्वास ठेऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा परिधान करून कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान माजी आमदार राजेंद्र जैन यांनी क्षेत्राच्या प्रगतीसाठी व सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. कार्यकर्त्यांनी जनकल्याणासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते : गोंदिया शहर : निर्मलाताई मिश्रा (माजी पार्षद), सुमन गुप्ता, सुनीता सोनवाने

लहिटोला:कमलेश नागपुरे, गणेश राऊत, झनक नन्हे

जब्बारटोला:सुरेंद्र चिखलोंडे, निखिल बागडे, राहुल लिल्हारे, सुखचंद ढेकवार, अमित चिखलोंडे

कन्हारटोला:कमलेश नागपुरे, संजीत आंबेडारे, अक्षय पटले, राहुल ढोमणे, लिखिलाल नागपुरे, आदित्य तुरकर

बिरसी:महेश सुरसाऊत

गिरोला:लोकेश राऊत

कासा:राजेश जमरे, विनोद पाचे, प्रीती शुक्ला, सतीश मरठे, प्रल्हाद जमरे, मनीष चौधरी

सडक अर्जुनी तालुका:दिनेश कोरे यांच्या नेतृत्वाखाली सोनाली ब्राम्हणकर, माया राऊत, कांचन मोटघरे, अमिता लांजेवार, ईश्वर मेश्राम, कैलास कापगते यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षात सामील झाले.

युवासेना सडक अर्जुनी तालुका:महेश डुंभरे यांच्यासोबत विनोद ब्राम्हणकर, मुन्ना ठाकूर, जस्मित मेश्राम, प्रीती ठाकूर, सुषमा डुंभरे आणि शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले.

कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, राजकुमार एन. जैन, अविनाश काशीवार, केतन तुरकर, किशोर तरोणे, बाळकृष्ण पटले, दिनेश कोरे, नानू मुदलियार, राजेश जमरे, मनोहर वालदे, नितीन टेम्भरे, आशा पाटील, विनीत सहारे, रवीकुमार पटले, शैलेश वासनिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर मिळालेले हे बळ आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून पक्षाची ताकद अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

 

Previous articleआंतरराष्ट्रीय सहकार गोंदियात उद्या सहकार चळवळीचा महत्त्वपूर्ण सोहळा
Next articleप्रत्येक जिल्ह्यात गोटुल केंद्र स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके..