प्रतिनिधी/पंकज रहांगडाले
भंडारा : तालुक्यातील आयुध निर्माणी जवाहरनगर येथे दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता दरम्यान स्पोट झाला. हा स्फोट कारखान्याच्या आरके युनिटमध्ये झाला. या स्पोटात 13 ते 14 लोक बाधित झाले. यातील 6 लोकांना रेस्क्यू करण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला. तर 7 ते 8 लोकं कारखान्यात अडकले असल्याची माहिती आहे. आज सकाळी झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते व जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन, एसडीआरएफचे पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, दाखल आहेत. बाधितांसाठी बचाव कार्य सुरु आहेत. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

