वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारत रत्न’ द्या – डॉ.हेमंत राहांगडाले   

0
42

शिवसेना तुमसर – मोहाडी विधानसभा कडून मा.द्रोपतीताई मुर्मूजी महामहीम राष्ट्रपती भारत सरकार राष्ट्रपती भवन,दिल्ली यांना निवेदनाच्या द्वारे हिंदुहृदयसम्राट व विश्वविख्यात व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारत रत्न’ घ्यावे अशी मागणी केली गेली आहे . अखंड हिंदुस्थानाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख विश्वविख्यात व्यंगचित्रकार तसेच हिंदू अस्मितेचे जनक वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त शिवसेना किंवा मराठी लोकांपर्यंत मर्यादित नसून ते अखंड हिंदुस्थानचे हिंदू विचार प्रेरक व्यक्ते होते त्यांनी राष्ट्र प्रेम हेच आमच हिंदुत्व असे विचार आपल्या भाषनातून संपूर्ण जगाला दिले आणि याचं विचारांची कास घेऊन आज अनेक नवयुवक तरुण पिढी आपल जीवन व्यतीत करीत आहे . आज अनेक युवक – युवती तसेच भारतीय मुलाचे नागरिक हे परदेशात नौकरी किंवा व्यवसाय करित आहेत आणि बाळासाहेबांच्या विचारांमुळे स्वत:ला भारतीय असण्यावर गौरव अनुभवतात आणि आजही बाळासाहेबांच्या हिंदुत्व व राष्ट्रप्रेमी विचारांमुळे त्यांची नाळ हि हिंदुस्थानाशी जुडलेली आहे आणि अशा स्पष्ट – निडर- बेधडक वक्ता आपल्या हिंदुस्थानात जन्मास येण हि सौभाग्याची बाब आहे . त्यांची व्यंगचित्रावरील पकड आणि त्यांच्या रुद्राक्ष धारण केलेल्या हातांनी आपल्या ब्रश नी अनेक देशविद्रोही संघटना आणि वृत्तींना धडा शिकवलेला आहे अनेक देश हिताच्या आणि समाज हिताच्या चळवळीत त्यांनी मुख्य भूमिका निभावलेली आहे हे आपण सर्वाना माहिती आहेच . आणि काही वर्षापूर्वी आपल्या सरकारने माजी प्रधानमंत्री स्व.पी.व्ही.नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून त्यांना हा मान दिलेलं आहे तर समस्त हिंदुस्थानातील हिंदूचे प्रेरणा स्थान हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यानां हा‘भारत रत्न’का नाही? भंडारा शिवसेना तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक व शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन आणि अखंड हिंदुस्थानातील जनमानसांच्या भावनांचा विचार करून माननीय महामहीम राष्ट्रपती साहेब आपण हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यानां पुढील जन्मसताब्दी जयंतीनिमित्त ‘भारत रत्न’ सम्मान घोषित करावे असे निवेदन मोहाडी तहसीलदार यांच्या मार्फत देण्याकरिता उपजिल्हाप्रमुख डॉ.हेमंत राहांगडाले,विधानसभा समन्वयक डॉ.शिवशंकर दृगकर,तालुका प्रमुख श्री.मधुभाऊ बुरडे,शहर प्रमुख श्री.नारायण निखारे,विभाग प्रमुख श्री.लक्ष्मण पवनकर,विभाग प्रमुख श्री.राजेंद्र बावणे,शिवसैनिक श्री.भगवान शेंडे आणि शिवसैनिक उपस्थित होते .