मार्फतः मा. तहसीलदार, तहसील आमगाव
निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीबाबत निष्पक्षतेची मागणी
आमगाव, (२५ जाने) : भारतीय राज्यघटनेने लोकशाही मूल्यांनुसार स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबर २०२४ च्या निवडणुकांतील निकालांनंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी करत निवेदन सादर केले आहे.
काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीतील विसंगतींबाबत पुढील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
1. मतदारयादीतील घोटाळा:लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली. याबाबत सविस्तर चौकशी करणे अत्यावश्यक आहे.
2. मतदान टक्केवारीतील तफावत:मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आलेली मतदानाची टक्केवारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घोषित केलेल्या टक्केवारीत मोठा फरक दिसून येतो.
3. सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी:सर्व मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात यावेत. रात्रीच्या वेळी अचानक वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत स्पष्टीकरण दिले जावे.
मतदारांचा संशय आणि लोकशाहीवरील प्रभाव : या निवडणुकीनंतर मतदारांमध्ये आपल्या मतदानाबाबत संशय निर्माण झाला आहे. आपले मत चोरीला गेले असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येत असून, यामुळे लोकशाहीवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या मागण्या
निवडणूक आयोगाने निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करून लोकशाहीची विश्वासार्हता जपावी.
मतदारयादीतील घोटाळ्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे.
निवडणूक निकालांबाबत पारदर्शकता राखण्यासाठी सविस्तर तपासणी करण्यात यावी.
तहसीलदार यांना निवेदनकर्ते संजय बहेकार, अध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,रामेश्वर श्यामकुंवर, अध्यक्ष, अनुसूचित जाती सेल,महेश उके, सचिव, तालुका भा.रा.कां.दिलीप टेंभरे, अध्यक्ष, गोंदिया जिल्हा किसान काँग्रेसवाय सी भोयर, राहुल चूटे, प्रभादेवी उपराडे, येवकराम उपराडे,देवकांत बहेकार, भोला गुप्ता, पिंकेश शेंडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने काँग्रेसने निवडणूक आयोगाला त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्याचे आवाहन केले आहे.

