आमगाव : विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मुरकूटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे सचिव रघूबीरसिंहजी सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमात राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत किक बॉक्सिंगमध्ये तृतीय स्थान मिळवणाऱ्या हर्षा भांडारकर आणि राष्ट्रीय स्तरावर पॉवर लिफ्टिंगमध्ये द्वितीय स्थान मिळवणाऱ्या यश पाऊलझगडे यांचा संस्थेचे सचिव श्री. सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य अशोक सिंग, प्रा. लोथे, प्रा. दारव्हनकर, प्रा. मानापूरे, प्रा. तरोने, प्रा. हाडोळे, प्रा. बारसे आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश कटरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संजय बुराडे यांनी केले.

