76 वा प्रजासत्ताक दिन संकल्प शाळा पुराडा येथे उत्साहात साजरा

0
187
1

देवरी : संकल्प शाळा पुराडा येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचे मुख्य मानकरी म्हणून मा. उत्तम नंदेश्वर, सचिव प्रबोधिनी प्रसारक बहुउद्देशीय शिक्षण मंडळ यांनी उपस्थिती लावली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अंबादे, व्यवस्थापन समितीचे प्रमुख बैस, वसतिगृहाचे अधीक्षक हरिनखेडे, सर्व शिक्षक, कर्मचारी, गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक  मडावी यांनी केले. अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव उत्साहाने व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.