आमगाव – भवभूती शिक्षण संस्था संचालित मानकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला भवभूती शिक्षण संस्थेचे सहसंचालक ललित मानकर, स्नेहा मानकर तसेच घटक संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते. श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ एज्युकेशन, कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक, प्रायव्हेट आयटीआय तसेच के.के. प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ललित मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी के.के. प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत वातावरण उत्साहाने भरून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.एस. पात्रीकर यांनी केले.

