हरवलेले ५१ मोबाईल परत मिळाले: आमगांव पोलीस स्टेशनची स्तुत्य कामगिरी

0
247

प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर मोबाईल मालकांना दिला मोठा दिलासा

आमगांव: पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन महिन्यांपासून हरवलेल्या ५१ मोबाईल फोनचे तांत्रिक कौशल्याने ठावठिकाणा लावण्यात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) या प्रणालीचा वापर करून, सुमारे ७,२१,९७७/- रुपये किमतीचे मोबाईल शोधण्यात आले. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमात, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील तीन महिन्यांत विविध तक्रारींमध्ये मोबाईल हरवल्याची नोंद आमगांव पोलीस ठाण्यात झाली होती. पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांनी या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेला हरवलेल्या मोबाईलच्या शोधासाठी मार्गदर्शन केले.

गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदारांनी CEIR प्रणालीचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचे अर्ज अपलोड केले आणि बुद्धिमत्तेचा वापर करत मोबाईल शोधले.

सदर कामगिरीत डी.बी. पथकाचे अंमलदार: पो. हवा. लिखीराम दसरे, दुधराम मेश्राम,पोशि. चेतन शेन्डे,विनोद उपराडे, नितीन चोपकर,असीम मन्यार,म.पो.हवा. ममता दसरे,पोशि शुभम शेन्डे
सायबर सेलचे अंमलदार:पो. हवा. संजय मारवाडे,पोशि. योगेश रहिले,रोशन येरणे आदि कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.
सदर कार्यवाही गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक व सायबर सेलच्या अंमलदारांनी अत्यंत कौशल्याने काम पूर्ण केले.

मोबाईल परत मिळाल्याने मालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांची ही प्रशंसनीय कामगिरी स्मरणात ठेवली.
पोलीसांच्या या तांत्रिक आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढला आहे.