आज दिनांक 26 जानेवारी 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अहेरी येथील डी.बी.ए.पब्लिक स्कूल मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी विद्यार्थी पालक व नागरिकांना संबोधन केले. या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद व पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

