आमगाव – श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र, रिसामा येथे आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वाय. सी. भोयर सर (माजी गट विकास अधिकारी, आमगाव) होते, तर ध्वजारोहण मा. यशवंत मानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. शंभुदयाल अग्रीका (बडमे गुरुजी, आमगाव), उमेश शेंडे (माजी सैनिक), मुलचंद कुरंजेकर आणि रवी क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्ष मा. वाय. सी. भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित लाभार्थी व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, जरी भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरी खरे स्वातंत्र्य संविधान लागू झाल्यापासून म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून मिळाले.
कार्यक्रमास तुलशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी, तसेच व्यसनमुक्ती केंद्रातील लाभार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजन समितीचे कौतुक केले आणि प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

