सालेकसा : जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा तिरखेडी येथे दिनांक 25 व 26 जानेवारी 2025 रोजी “आगाज 2025” शालेय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. सौ. प्रमिलाताई गणवीर (माजी सभापती, पंचायत समिती सालेकसा) यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. विमलताई बबलूजी कटरे (सदस्य, जिल्हा परिषद गोंदिया) होत्या.
दीपप्रज्वलन सोहळ्यात मा. वीणाताई कटरे (सभापती, पंचायत समिती सालेकसा), सौ. प्रियाताई शरणागत (सरपंच, ग्रामपंचायत तिरखेडी), सौ. रेखाताई फुंडे (सदस्य, पंचायत समिती सालेकसा), मा. भूषण बुराडे (पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सालेकसा) यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अन्य प्रमुख पाहुणे म्हणून मा. व्ही. एस. डोंगरे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सालेकसा), मा. एम. एल. मेश्राम (वरिष्ठ विस्तार अधिकारी, पंचायत समिती सालेकसा), कुमारी एस. एस. पाचे (केंद्रप्रमुख, तिरखेडी केंद्र), तसेच मा. एस. जी. जोगी (केंद्रप्रमुख, पंचायत समिती सालेकसा) उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. जाधव, शिक्षक समुधलाल कुंभरे, चेतन राठोड, निशांत रहांगडाले, श्रीमती मैना मोरे, श्रीमती शारदा चंद्रिकापुरे, लक्ष्मीकांत तुरकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कटरे, गावातील पालक वर्ग, ग्रामस्थ आणि विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटक, गीते आणि सादरीकरणाच्या माध्यमातून आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. दुसऱ्या दिवशी, 26 जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या वेशभूषेत मिरवणूक काढली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधील कामगिरीबद्दल बक्षिसे वितरित करण्यात आली. तिरखेडी गावातील पालक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी दिलेले सहकार्य अतुलनीय होते. “आगाज 2025” ने गावाला एकत्र आणण्याचा व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला.

