संत तुकाराम महाराजांच्या सुभाषितावर आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे संपन्न

0
123

राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित

भामरागड, 27 जानेवारी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. विद्यापीठाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातून पाच महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी भामरागड महाविद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. कैलास व्हि. निखाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. कांचन धुर्वे (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्रा. चिन्ना चालुरकर होते.

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे  व प्रा. डॉ. सुनंदा पाल (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी) यांनी भूमिका पार पाडली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संतोष डाखरे  व प्रा. डॉ. अतुल खोब्रागडे  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. कैलास निखाडे यांनी स्पर्धेचे नियम व महत्व स्पष्ट केले. एकूण 12 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला, ज्यामध्ये राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी येथून दोन विद्यार्थिनींचा सहभाग होता.

विजेते:

1. प्रथम क्रमांक: कु. योगिता मुरमुरवार (राजे धर्मराव सायन्स महाविद्यालय, अहेरी)

2. द्वितीय क्रमांक: कु. ममता भांडेकर (राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड)

3. तृतीय क्रमांक: श्री. किरण कुरसामी (राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड)

 

कार्यक्रमाचे संचालन कु. रोहिणी पुंगाटी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. ममता भांडेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  बंडू बोंडे, सुनिल ताजणे, तसेच विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी विशेष मेहनत घेतली.

संपूर्ण स्पर्धा संत तुकाराम महाराजांच्या विचारांची महती अधोरेखित करणारी ठरली व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य सादर केले.