
बोरकन्हार ग्राम पंचायत सदस्याचा भाजपामध्ये प्रवेश
आमगांव : दि. 28 जानेवारी 2025 रोजी, मंगळवारी बोरकन्हार येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ग्राम पंचायत बोरकन्हारचे सदस्य होपचंद टेंभरे यांनी पक्षप्रवेश केला. पूर्वी काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले होपचंद टेंभरे यांनी भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत जिल्हाध्यक्ष अँड. येसुलाल उपराडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील भाजपाचे संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष भाजप आमगाव राजेंद्र पटले यांनी भूषविले. जिल्हाध्यक्ष अँड. येसुलाल उपराडे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन टेंभरे यांचा पक्षप्रवेश सन्मानपूर्वक केला.
उपरोक्त कार्यक्रम खुमेश कटरे (अध्यक्ष, कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बोरकन्हार) यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर आणि कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद भाजप कार्यकर्ते सुदाम कोसरे, माजी सरपंच भोजराज ब्राह्मणकर, आशिष कटरे, माजी सरपंच शैलेश मेश्राम, लखन कटरे, सेवक बिसेन, शिवचरण पुंडे, ठाणसिंग राणे, मोरेश्वर पुंडे, मानसिंग पटले, नटवरलाल कटरे, पोमेंद्र पटले, अशोक बोपचे यांचा समावेश होता.
पक्षप्रवेशानंतर होपचंद टेंभरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर आपला दृढ विश्वास व्यक्त केला. त्यांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय योगदान देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
होपचंद टेंभरे यांचा पक्षप्रवेश भाजपाच्या स्थानिक पातळीवरील संघटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या विविध उपक्रमांसाठी होईल, असे जिल्हाध्यक्ष अँड. येसुलाल उपराडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.


