चामोर्शी येथील यशोधरा विद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रमात सुयश

0
88

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले

चामोर्शी-७६ वा प्रजासताक दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायत चामोर्शी द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये गट क माध्यमिक विभागातून यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शीच्या चम्मुनी उतम सादरीकरण करून द्वितीय पारितोषिक पटकाविले. जयश्री कोठारे, प्रविण नैताम , सरीता वैद्य यांच्या विशेष मार्गदर्शनाने हे यश संपादन केले.यावेळी राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा कौशल्या सहारे, सचिव विवेक सहारे , कोषाध्यक्ष वक्टुजी उंदिरवाडे , सदस्या रेखा साखरे , माणिक साखरे , प्राचार्य शाम रामटेके यांनी विजयी टीमचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.यशस्वितेसाठी राजू धोडरे, गुरुदेव सातपुते, निलेश क्षीरसागर प्रा. प्रशांत वालदे , प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे , लोकनाथ दुधबळे , अमोल उंदीरवाडे , सुधाकर भोयर , लक्ष्मण गव्हारे, रूपलता शेंडे यांनी सहकार्य केले.

Previous articleहोपचंद टेंभरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
Next articleप्रभाग क्र. १४ भीमनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न