पक्ष संघटन बळकट करण्यासाठी बूथ कमिट्यांच्या कार्यान्वयनावर भर
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीकरणासाठी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष नानू मुदलियार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्नी चौरे यांच्या निवासस्थानी पार पडली.
बैठकीत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच बूथ कमिटीच्या कार्यान्वयनावर विशेष भर देण्यावर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीत पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आले.
बैठकीला प्रामुख्याने नानू मुदलियार, नागो बन्सोड, प्रमोद उके, प्रशांत कंसारे, राजा बन्सोड, राजेश बन्सोड, सुहास उके, शुभम मोरे, संदेश चौरे, राज हुमणे, अंगू डोंगरे, आयुष्य मेश्राम, विशाल मेश्राम, अतिश भोयर, सोनू बिरंनवार, विशाल पासवान, अमन घोडीचोर, भूषण पाहिलं, अनिकेत खंडारे, प्रतिकार चौरे, राजा मेश्राम यांसह प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान स्थानिक पातळीवरील पक्ष बळकटीकरण आणि जनसंपर्क मोहिमा प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन करण्यात आले. आगामी निवडणुकीत पक्ष अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले.

