राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प.)महिला आघाडी च्या वतीने हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन

0
64

अहेरी /प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार तसेच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे तसेच महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम,जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई अलोणे यांच्या मार्गदर्शनात व सारिका ताई गडपल्लीवार तालुकाध्यक्ष अहेरी यांच्या पुढाकाराने अहेरी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम दिनांक 28 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम या प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने लक्ष्मीताई कुडकावार पूर्वा ताई दोनतुलवार,पुष्पाताई अलोने महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनींनी हजेरी लावली होती. यावेळेस विधवा महिलांना हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला.