आज दिनांक 29 जानेवारी रोजी भामरागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अ. प.)वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तनुश्री ताई धर्मराव बाबा आत्राम सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुष्पाताई अलोने महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट,मालती भांडेकर तालुका अध्यक्षा भामरागड ह्या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उषाताई भांडेकर यांनी केले. कार्यक्रमाला देवी वडे,आयतू पोताडि,जाणूमनु मीच्या, व भामरागड परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

