प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी संधी परिवाराची उदार मोहीम
आमगांव : संधी परिवार गोंदिया यांच्या वतीने दरवर्षी आमगांव तालुक्यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना संधी टॉपर्स अवार्ड प्रदान करण्यात येत असते. या वर्षीही हा कार्यक्रम ४ फेब्रुवारी २०२५, मंगळवारी, शिक्षण महर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजीयांच्या जयंतीनिमित्त श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध शैक्षणिक संस्थांमधून उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांची यादी:
१. श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगांव
– कुमार धनंजय राधेकुशन शिवनकर (८४.४६%)२. श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), आमगांव
– कु. पल्लवी गिरधारी ठाकुर (७२.९५%)३. डी.एल.एड (२०२२-२३)
– कु. रीता हरिराम कथलेवार (८६.१०%)४. डी.एल.एड (२०२३-२४)
– कु. भारती जितेंद्र घरडे (८५.४०%)५. श्री लक्ष्मणराव मानकर प्रायव्हेट आय.टी.आय. महाविद्यालय
– सचिन तुलसीदास मेंढे (इलेक्ट्रीकल शाखा, ८३.१६%)६. श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक
– कु. श्रुष्टी सुकलाल ठाकरे (८२.५६%)७. विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, आमगांव
– कु. दिक्षा शिहोरे (१२वी, ९२.६७%)
– कु. अदिती भदोरिया (१०वी, ९४.६०%)८. भवभूती महाविद्यालय
– कुमार सौरव महेंद्र राहुलकर (बी.एस.सी., ७८.८८%)
या सर्व विद्यार्थ्यांना ४ फेब्रुवारी २०२ रोजी संधी टॉपर्स अवार्ड सोहळ्यात स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम इत्यादी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षणक्षेत्रातील सर्वच आदरणीय व्यक्तींनी उपस्थित राहून या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केशवराव एल. मानकर (सचिव, भवभूती शिक्षण संस्था, आमगांव) आणि डॉ. डी.के. संघी (प्राचार्य, श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगांव) यांनी केले आहे.

