आमगाव : विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय बुराडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. तरोने, प्रा. सातोकर, प्रा. कटरे, प्रा. बारसे, प्रा. पटले मॅडम आणि पूंड मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त केल्या. हिमानी नागवंशी, हर्षा भांडारकर, तुलसी कुसराम, प्राची पागोटे आणि ज्ञानेश्वरी नागोसे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
या भावनिक सोहळ्याचे सुंदर आणि आकर्षक सूत्रसंचालन दिव्या दोनोडे हिने केले, तर आभार प्रदर्शन रोहिणी उपरीकर हिने मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

