प्रतिनिधी/मुकेश शुक्ला
तुमसर तालुक्यातील सिहोरा मागील दहा वर्षापासून रखडलेल्या किशोर पटले ते शांताबाई गौतम यांचे शेतापर्यंतचा पांदण रस्ता माती काम सुरू झाल्यामुळे परिसरातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आनंद खदखदत असल्याचे आंदोलनकर्ते शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त भूमिपूजन सोहळ्यातून दिसून आले. शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर, धान मशीन , बैलबंडी, इतर यंत्र व पायदळ जाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात यावा यासाठी दरवर्षी प्रयत्न केल्या जात होता.यात अनेक कारणे सांगून याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. या प्रकरणात प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी 27 जानेवारी पासून आंदोलन उभारले जाईल असा खरमरीत इशारा 27 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिला होता. या प्रकरणाची खंडविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर व ग्रामपंचायत उपसरपंच सलाम भाई शेख यांनी दखल घेतली व खंडविकास अधिकारी यांच्या लेखी आदेशान्वये ग्रामपंचायत सिहोरा येथे 29 जानेवारी रोजी पांदण रस्त्याचे भूमिपूजन करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच सलाम भाई शेख, सदस्य कादरभाई अन्सारी, महेश कामथे, वैशाली राऊत, कविता शरणागत, लता दलाल, धनीका निनावे, सविता नेवारे, चित्ररेखा सोनकुसरे जे.ई. दर्शित चवळे, रोजगार सेवक अशोक गौतम, अंकुश लांजेवार, अमित रंभाळ, मयूर लांजेवार, वनिता चौधरी, आरती कामथे, अपर्णा कामथे व आंदोलन करते शेतकरी रामलाल बिसेन, रोषनाथ खेताडे, लुलचंद गोटेफोडे, बाबूलाल बिसेन, अजय बिसेन, छोटू भाऊ गौतम, ललित पारधी व इतर शेतकरी उपस्थित होते.

