गडचिरोली /प्रतिनिधी
वडलापेठ येथे मियाम चारिटेबल ट्रस्ट कडून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी नर्सरी ड्रायव्हिंग शिलाई चे प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती नियम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नीतू जोशी यांनी आज सांगितले.पुढे भविष्यातही अशा प्रकारचे विविध प्रशिक्षण देऊन महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मियाम चॅरिटेबल ट्रस्ट हे नेहमी अग्रेसर राहील अशी माहिती नीतू जोशी यांनी दिले आहे. महिलांना सिक्युरिटी हाउसकीपिंग स्टॉप मॅनेजमेंट जीएसटी सारख्या ट्रेनिंग देण्याचे मानस असल्याचा त्यांनी सांगितले.मियाम चॅरिटेबल ट्रस्ट च्या उपक्रमाला प्रतिसाद देत वडलापेठ व परिसरातील महिलांनी सुद्धा या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला आहे. व नीतू जोशी यांचे आभार मानले आहे.

